भूयारी मार्गाऐवजी उड्डाण पूल उभारा; पोसरी ग्रा.पं.ची मागणी

| रसायनी | वार्ताहर |
कोकण रेल्वे लाईन अंतर्गत मौजे जुनी पोसरी रसायनी रेल्वे स्टेशनजवळ भुयारी मार्गाचे काम चालू केले आहे.त्याऐवजी येथे उड्डाणपूल उभारला जावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. सदर कामाचे रस्ता मार्ग हे दक्षिणकडे काढत आहेत असे निदर्शनात आले आहे . परंतु मौजे जुनी पोसरी व ठाकूरवाडी ह्या गावांचा मार्ग उत्तरेकडे असल्याने व सदर गावाची लोकसंख्या जास्त असल्याने तसेच पोसरी गाव तुराडे गाव तसेच ठाकूरवाडी गावची शेत जमीन असल्यामुळे विकासाच्या दृष्टीने मोठी अडचण निर्माण होणार आहे. सदर नाल्याची उंची पेक्षा 10 फुट भुयारी मार्ग खाली असल्यामुळे पावसाळी जास्त प्रमाणात पाणी नाल्याने येत असल्यामुळे भुयारी मार्गात 10 फुट पाणी राहील त्यामुळे सदर भुयारी मार्गाचा काहीही उपयोग होणार नाही. सदर भुयारी मार्ग रदद करून उड्डाणपूल बांधून मिळावे त्यामुळे ग्रामस्थांचा मार्ग सुरक्षित होईल असा ग्रुप ग्रामपंचायत पोसरी यांच्यावतीने रेल्वे मंत्रालय सदस्य अभिजित पाटील यांना दिला आहे.यावेळी अरविंद पाटील, गणेश थोरवे, महादेव देसाई उपस्थित होते.

Exit mobile version