किरण गायकवाड यांचे ममदापूर ग्रामपंचायतकडे निवेदन
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील नेरळ शहरालगत असलेल्या ममदापुर ग्रामपंचायत मधील अस्तित्वात असलेले समाजमंदिर अपुरे पडत असल्याने भविष्यातील विचार करत प्रशस्त, अत्याधुनिक समाज मंदिर उभारावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. तर याबाबत पुढाकार घेत सामाजिक कार्यकर्ते किरण गायकवाड यांनी याबाबतचे निवेदन ग्रामपंचायतीला देखील दिले आहे.
कर्जत तालुक्यातील विस्ताराने आणि आर्थिक उत्पनाने तिसर्या स्थानावर असणार्या ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत विविध प्रासंगिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सध्या अस्तित्वात असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह समाज मंदिर ममदापूर ही वास्तू अपुरी पडत आहे. साधारण 30 पूर्वी बांधलेल्या या वास्तू आता जुनी झाल्याने याबाबत ग्रामस्थांनी अनेकवेळा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यानुषंगाने येथील युवा सामाजिक कार्यकर्ते किरण गायकवाड यांनी पुन्हा एकदा लेखी मागणीच्या आधारे ग्रामपंचायतीचे सरपंच दामोदर निरगुडा, ग्रामविकास अधिकारी संजय राठोड यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे.
ममदापूर ग्रामपंचायतीने स्वतःच्या मालकीतून किंवा नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रातील राखीव असणार्या भूखंडातून किमान 2 गुंठे जागा सदर प्रस्तावित समाजमंदिरासाठी उपलब्ध करून दिली तर वाचनालय, व्यायामशाळा, खुले सभागृह इत्यादी सुविधा निर्माण करता येतील जेणेकरून त्याचा लाभ असंख्य नागरिकांना घेता येईल.
श्रावस्ती सचिन अभंगे, माजी सदस्या ममदापूर ग्रामपंचायत