लाखोंचे नुकसान
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शहरातील ब्राम्हण आळीतील दत्त मंदिराजवळील लक्ष्मी व्हीला इमारतीमधील एका निवासी सदनिकेमध्ये शॉर्ट सर्किटमुळे सकाळी 6 च्या सुमारास आग लागली. या आगीत सदनिकेतील साहित्य जवळून खाक झाले. सुदैवाने घरी कोणी नसल्याने जीवीतहानी टळली. या आगीमुळे इमारतीच्या विद्युत केबलचे नुकसान झाले असून केबल बदलण्याचे काम महावितरण कडून तातडीने सुरू करण्यात आले आहे.
सकाळी आगीचे वृत्त समजताच अलिबाग नगरपालिकेचे बंब आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते. तत्पुर्वी लक्ष्मी व्हीला सोसायटी मधील नागरिकांनी पाण्याच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविले होते. अलीकडच्या दिवसात शहरातील अनेक भागात शॉर्ट सर्किटमुळे विद्युत केबल निकामी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नवीन केबल टाकण्याचा खर्च ग्राहकांना करावा लागत असल्याने महावितरणने हा खर्च करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.