बेकरे येथे घरफोडी

। नेरळ । वार्ताहर ।
नेरळ जवळील बेकरे या गावात घरफोडी झाल्याची घटना घडली आहे.चोरटयांनी पाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत फिर्यादी यांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून नेरळ पोलीस याबाबत आरोपींचा शोध घेत आहेत. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजय देहू कराळे रा. बेकरे यांनी भिशीची घरात पाच लाख रुपयांची रोकड ठेवली होती. हे भिशीचे पैसे वाटप करायचे होते. त्यामुळे आपल्या बेडरूममधील कपाटात हे पैसे त्यांनी ठेवले होते. मात्र रात्रीच्या सुमारास चोरटयांनी त्यांच्या घराच्या किचनमधील जाळी तोडून त्यातून घरात प्रवेश केला. तसेच कपाटामधील रक्कम लंपास केली.हि बाब सकाळी लक्षात आल्यावर कराळे यांनी थेट नेरळ पोलीस ठाणे गाठत आपली फीर्याद दाखल केली. नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत काळे हे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version