| अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बंद घराच्या दरवाजाची कडी तोडून आतील 20 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना चेंढरे स्वामी समर्थनगर पिंपळभाट येथे घडली आहे.
याबाबतचे वृत्त असे की, 19 ते 20 जानेवारी दरम्यान कृष्ण पॅलेस सोसायटी तळमजला रूम नं 05, स्वामी समर्थ नगर, चेंढरे-अलिबाग यांच्या घराचा दरवाजा बंद होता. सदर बंद घराच्या दरवाजाची कडी तोडुन अज्ञात चोरटयांनी त्यावाटे घरात प्रवेश मिळवला. त्यानंतर घरात असलेल्या एकुण 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले.
याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात भा.दं.वि.क. 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अभिजीत पाटील हे करीत आहेत.