| पनवेल | वार्ताहर |
खारघर वसाहतीमधील दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडीत हजारो रुपये किंमतीचा ऐवज लंपास झाल्याची घटना घडली आहे. खारघर सेक्टर- 3 बेलपाडा येथे आनंद पाटकर हे राहतात. त्यांच्या राहत्या घरातून चोरट्याने चोरी केली. तसेच, खारघर सेक्टर- 10 येथे राहणारे तेजस भोंग यांच्याही घरात चोरी झाली आहे. दोघांच्या घरातून मिळून 66 हजार रुपयांचे सहा मोबाइल आणि एक लॅपटॉप चोरी झाला आहे. या घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.