रोख रक्कम आठ हजार केले लंपास
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील वावंजे येथे एका घरामध्ये अज्ञात चोरट्याने घरफोडीकरून घरातील बेडरूम मधील कपाटातील 8 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. सलाउद्दीन शेख यांचे राहते घर बंद असलयाचे पाहून अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घराचा मागील दरवाजा कशाने तरी तोडून त्या वाटे आत प्रवेश करून बेडरूम मधील कपाटातील 8 हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोल्सी ठाण्यात करण्यात आली आहे.






