अलिबाग मध्ये घरफोडी

। अलिबाग । वार्ताहर ।
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोर्‍या आणि घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी दिवसा-ढवळ्या अलिबाग शहरात दोन ठिकाणी तिन घरफोड्या झाल्याने नागरीकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी सकाळी सव्वा आकराच्या सुमारास अलिबाग शहरातील बाजार पेठ परीसरात तिन चोर्‍या झाल्या आणि अलिबाग पोलीस ठाणे यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अलिबागमधील मारूती नाक्याजवळील कमलकुंज बिल्डिंगमध्ये राहणाय्रा सादील मुकरी यांच्या घरात घरफोडी झाली आहे. तसेच झालेल्या या घरफोडीत चांदीच्या व काही छोट्या-मोठ्या वस्तू चोरीला गेल्या आहेत. अलिबाग पोलीस ठाणे येथे याबाबतची कागदोपत्री तक्रार सध्या दाखल झालेली नसून अलिबाग पोलीस ठाण्याचे शोधपथक घटनास्थळी जावून त्यांचा तपास सुरू आहे.

Exit mobile version