| माणगाव । वार्ताहर ।
तालुक्यातील रवाळजे येथील एम.एस.बी. कॉलनीमध्ये बंद असलेली सहा फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरटयांनी घरातील 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिन्यांचा ऐवज घेऊन फरार झाले आहेत. याबाबतची फिर्याद अनिल दुंडाप्पा अथणे(वय-32) रा.एम.एस.बी.कॉलनी रवाळजे ता.माणगाव मूळ रा.उदगाव जि.कोल्हापूर यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
तसेच फ्लॅट नं.एफ 1/6 मध्ये राहणारे नथुराम मारुती मालुसरे, फ्लॅट नं.एफ 3/2 मध्ये राहणारे अजित लक्ष्मण सुर्वे, फ्लॅट नं.डी 1/3 मध्ये राहणारे संदेश शिवाम कदम, फ्लॅट नं.1/4 मध्ये राहणारे शिवाजी बरगे, फ्लॅट नं.इ 2/3 मध्ये राहणारे सुभाष चंद्रकांत विरणक, फ्लॅट नं.इ 2/4 मध्ये राहणारे अविनाश राऊत यांच्या सुद्धा बंद घरांचे कुलूप तोडून नुकसान केले. या घटनेची माहिती समजताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली.
सदर घटनेचा अधिक तपास माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. लहांगे हे करीत आहेत.