शेलूमध्ये घरफोडी! सव्वा लाखांचा ऐवज लंपास

| नेरळ | प्रतिनिधी |

शेलू आणि बांधिवली भागातील इमारतीमधील बंद घरामध्ये अज्ञात चोरट्यांनी घुसून सव्वा लाखाचे दागिने लंपास केले. याबद्दल नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून घराचे मालक हे मुंबई येथे राहत असून त्यांचे हे सेकंड होम आहे.

युनिटी गृहनिर्मण सहकारी सोसायटी असून त्या ठिकाणी मुंबई अंधेरी येथील राहणारे सुश्मिता साठे यांचा फ्लॅट आहे. तो फ्लॅट साठे कुटुंबीय सेकंड होम म्हणून विकेंड होम म्हणून वापर करतात. 17 नोव्हेंबरनंतर ते कुटुंब बांधिवली येथील फ्लॅट वर आले नव्हते आणि नऊ डिसेंबर रोजी आले असता त्यांना घरात सर्व साहित्य विस्कटलेले दिसले. त्यावेळी घराची पाहणी केली असता तेथील खिडकीची लोखंडी तावदाने तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता, त्या घरात ठेवून दिलेल्या अनेक वस्तुंवर चोरट्यांनी डल्ला मारला होता. त्यात सोन्याची दागिने आणि काही साहित्य यांचा समावेश होता.

चोरट्यांनी घरफोडी करून सुश्मिता साठे यांच्या घरातील सोन्याची चेन, सोन्याच्या बांगड्या, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची कर्णफुले, मनगटी घड्याळ तसेच गॅस शेगडी, नळ आदी वस्तू गायब केल्या होत्या. त्या सर्व ऐवज यांची बाजार मूल्य सव्वा लाख एवढे आहे. त्याबद्दल सुस्मिता साठे यांनी नेरळ पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे.

Exit mobile version