भीषण अपघात! उभ्या ट्रकला बसची धडक; वाहकाचा मृत्यू

। नागपूर । प्रतिनिधी ।

चंद्रपूरमध्ये भीषण अपघात घडला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसने जोरदार धडक दिली. या अपघातात वाहकाच्या मृत्यू झाला असून 11 ते 12 प्रवासी जखमी झाले आहेत.

नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील पडोली येथील हायटेक फार्मसी कॉलेज समोर ही भीषण अपघाताची घटना घडली असून या अपघातामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. ही बस नागपूरवरून चंद्रपूरकडे जात होती. दरम्यान, रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात वाहकाचा मृत्यू झाला. संदीप वनकर असे मृत वाहकाचे नाव आहे. तसेच, या अपघातात 11 ते 12 प्रवासी जखमी झाले असून सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी 3 जणांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचीही माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच पडोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे.

Exit mobile version