ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे बससेवा बंद

ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याचे मुख्याधिकार्‍यांचे संकेत

| खोपोली | वार्ताहर |

नगरपरिषद हद्दीत शहर बस प्रवासी वाहतूक 12 जून 2024 पासून संबंधीत ठेकेदाराने बंद केली आहे. त्यामुळे खोपोली नगरपरिषद हद्दीतील नागरिकाची गैरसोय झाली असून संबंधित ठेकेदाराच्या मनमानी कारभाराबाबत प्रवासी नाराजी व्यक्त करत असून संबंधित ठेकेदारावर लवकरात लवकर कारवाई करत बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. प्रवाशांची गैरसोय करणार्‍या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

खोपोली शहरातील नागरिकांना अल्प दरात खोपोली शहरातील विविध भागात प्रवास करता यावा म्हणून खोपोली नगरपरिषदेच्या वतीने 1/5/2013 रोजी बससेवा सुरू केली होती, त्यामुळे खोपोली शहरातील नागरिकांना या बससेवीच्या माध्यमातून दिलासा मिळाला होता. तर खोपोलीकर नगरपरिषदेच्या या कारभाराबाबत समाधान व्यक्त करत होते.

तर शहर परिवहन सेवेत असलेल्या सिटी बसचा ठेका सुधीर रोडलाईन याना चालविणे कामी देण्यात आला आहे. ठेकेदारची आजपर्यंत थकीत रॉयलटी रक्कम रु.76,96,391, भुभाडे रक्कम रु. 2,49,591, विजबिल रक्कम रु. 80,250 रक्कम थकीत आहे. संबंधित ठेकेदार यांनी दि. 25/8/2021 रोजी शेवटची रॉयल्टि रक्कम रु. 2,24,000, भुभाडे रक्कम रु. 2,49,591, विजबिल रक्कम रु. 80,250 नगरपरिषद फंडात जमा केली आहे. त्यानंतर आज पर्यंत कोणतीही थकीत रॉयल्टि रक्कम, भुभाडे आणि विज बिल नगरपरिषद फंडात जमा केले नाही. तर इतके थकीत रक्कम येणे असताना देखील संबंधित ठेकेदार यांनी अचानक बस सेवा बंद करून खोपोली नगरपरिषद हद्दीतील नागरिकाची गैरसोय केले असून नगरपरिषदेस वेठीस धरण्याचा ठेकेदार प्रयत्न करीत असल्याचे पाहायला मिळत असताना पुढील काळात खोपोलीकरांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे ठेकेदारावर खोपोलीतील बस सेवेतून प्रवास करणारे प्रवासी वर्ग नाराजी व्यक्त करत असून ही बस सेवा लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी करत आहेत.

ठेकेदाराने अचानकपणे बस सेवा बंद करत नागरिकांची गैरसोय करण्याचा प्रयत्न केल्याने या गंभीर समस्येची याची दखल घेऊन नगरपरिषदद्वारे कठोर कार्यवाही सबंधित ठेकेदारवर करण्यात येणार आहे. तर सिटी बससेवा बंद कालावधीमध्ये नागरिकानी नगरपरिषदेस सहकार्य करावे.

डॉ.पंकज पाटील
मुख्याधिकारी तथा प्रशासक – खोपोली नगरपरिषद
Exit mobile version