म्हसळ्यातील बससेवा पूर्ववत सुरू

। म्हसळा । वार्ताहर ।

म्हसळा एस.टी.स्थानक ते नवानगर असा 1 किलो मिटर अंतराचा काँक्रिट रस्त्याचे नुतनीकरण करण्याचे काम मागिल चार महिन्यांपासून कार्यान्वित होते. रस्ता अरुंद असल्या कारणाने बांधकामाला अडथळा येऊ नये म्हणून म्हसळा शहरातून एसटी वाहतूक सेवा पुर्णतः बंद ठेवण्यात आली होती. याचा व्यावसायिक परिणाम म्हसळा शहरातील बाजारपेठ आणि छोट्या-मोठ्या दुकानदारांवर झाला होता. त्यातच प्रवाशांच्या वेळेचा आणि पैशांचा अपव्यय होत होता. आता चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर एसटी वाहतूक सेवा सुरू करण्यात आल्याने म्हसळा बाजारपेठ बहरली आहे.

Exit mobile version