परिवहनमंत्र्यांनी तातडीने दखल घ्यावी
| श्रीवर्धन | वार्ताहर |
सात बस स्लीपकर..
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून पुन्हा एकदा प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू झाल्याचे मिळत आहे. महामंडळाने आपल्या ताफ्यामध्ये काही भाडेतत्त्वावर बस आणल्या असून, त्या बसेसवर खासगी चालक तैनात करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे जे चालक आहेत, त्यांना प्रशिक्षण देण्यात येते व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच त्यांना 40 ते 50 प्रवासी घेऊन जाण्याची परवानगी महामंडळाकडून देण्यात येते. परंतु, श्रीवर्धन आगारासह संपूर्ण विभागात त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात परिवहन मंत्रालयाच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने खासगी बसेस पुन्हा एकदा सुरू केल्या आहेत. या बसेसवर चालक खासगी असून, वाहक परिवहन महामंडळाचा असतो.
या बसेस चालवणार्या चालकांना कोणत्याही प्रकारे मोठी बस चालवण्याचा अनुभवदेखील नसल्याचे निष्पन्न झाले आहे. या अगोदरदेखील दिवाकर रावते राज्याचे परिवहनमंत्री असताना या वातानुकूलित बसेस खासगी तत्त्वावरती घेण्यात आल्या होत्या व या खासगी बसेसवर खासगी चालक नेमण्यात आलेले होते. या चालकांकडून अनेक वेळा भीषण अपघात घडल्याचेदेखील पाहायला मिळाले होते. परंतु, पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तीच चूक केली आहे. श्रीवर्धन आगारातून लांब पल्ल्याच्या सुटणार्या बसेस श्रीवर्धन, सातारा, मिरज, लातूर, नालासोपारा, मुंबई या मार्गावरती खासगी बसेस व खासगी चालक असलेल्या फेर्या सुरू करण्यात आलेल्या आहेत. अनेक वेळा हे खासगी चालक बस चालविताना मोबाईलवर बोलत असतात. बस अतिवेगाने चालविण्याचे प्रकार होत असतात. खासगी चालकाकडून बसला अपघात होऊन कोणीही प्रवासी जायबंदी झाल्यास अथवा जीवाला मुकल्यास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या जबाबदार असणार आहे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. तरी राज्याच्या परिवहनमंत्र्यांनी या गोष्टीचा पुनर्विचार करून सदर बसेसवर परिवहन महामंडळाचेच प्रशिक्षित ड्रायव्हर पाठवावेत, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.