| कर्जत । वार्ताहर ।
कर्जत नगर परिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने कर्जत शहरातील महिला व मुलींना स्वतःचा व्यवसाय स्वयंरोजगार मिळवण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या सभागृहात प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती विशाखा जिनगरे, संचिता पाटील, वैशाली मोरे, नगरसेविका पुष्पा दगडे, भारती पालकर, मधुरा चंदन,सुवर्णा निलधे, बळवंत घुमरे आदी उपस्थित होते.
या प्रशिक्षण शिबिरात डव्हान्स ब्युटी पार्लर प्रशिक्षण, कराटे व जुडोचे प्रशिक्षण, रेडिमेड गारमेंट, टेलरिंगचे प्रशिक्षण, डव्हान्स बेकरीजन्य पदार्थ बनविणे यांचा समावेश आहे. महिला व बाल कल्याण विभागाच्या सायली निंबरे यांनी आभार मानले.






