| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्या घटस्फोटाला तीन महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे. मात्र, आता सानियाने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा या दोघांची चर्चा सुरू झाली आहे.
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकला घटस्फोट दिल्यानंतर सानिया सोशल मीडियावरील पोस्टद्वारे अनेकदा अप्रत्यक्षपणे व्यक्त झाली आहे. त्यामुळे तिने लिहिलेली पोस्ट ही शोएब आणि तिच्या आताच्या परिस्थितीबाबत असू शकते, असा अंदाज नेटकरी बांधतात. बुधवारी सानियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. त्यातील मजकूर वाचल्यानंतर पुन्हा एकदा नेटकर्यांनी सानियाविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे. सानियाची ही पोस्ट मोकळेपणे व्यक्त होण्याबद्दलची होती. ‘या आधी मला कधीच इतकी बोलायची इच्छा झाली नव्हती, पण तरी मी थोडंच बोलले. माझ्या मनात खूप काही साटलं पण तरी मी गप्प राहिले,’ अशा आशयाची ही पोस्ट आहे. सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाला आता जवळपास तीन महिने झाले आहेत. मात्र, सानियाच्या या पोस्टमुळे पुन्हा एकदा शोएबसोबतच्या तिच्या नात्याची चर्चा होऊ लागली आहे. सानिया आणि शोएबने 2010 मध्ये हैदराबादमध्ये लग्न केले होते. भारत आणि पाकिस्तानात या दोघांचे नातं मोठा चर्चेचा विषय ठरला होता. घटस्फोटानंतरही पुन्हा एकदा ही जोडी दोन्ही देशांमध्ये चर्चेत आली.
काय आहे सानियाच्या पोस्टमध्ये- जानेवारी महिन्यात शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी विवाह केला. या लग्नाचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर सानियासोबतच्या घटस्फोटाची चर्चा झाली. त्यानंतर सानियाच्या कुटुंबीयांकडून याबाबतची अधिकृत माहिती दिली. घटस्फोटानंतर सानिया तिच्या मुलासोबत दुबईमध्ये राहत आहे. या दोघांना इझान मिर्झा मलिक हा मुलगा आहे. दुसरीकडे शोएब आणि सना हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. याविषयी पाकिस्तानी पत्रकार नईम हनिफने एका पॉडकास्टमध्ये सांगितले, ''एका टेलिव्हिजन रिअॅलिटी शोदरम्यान सना आणि शोएब यांची पहिल्यांदा भेट झाली होती. या शोदरम्यान दोघांची खूप चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर शोएब जेव्हा कधी टीव्हीवर यायचा, तेव्हा तो सनालाही सोबत आणण्याबद्दल आग्रह करायचा.''