आ. जयंत पाटील यांचे प्रशंसोद्गार
। भाकरवड । वार्ताहर ।
आयएसएस परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रतीक जुईकर यांनी केवळ आगरी समाजाचेच नव्हे तर संपूर्ण खारेपाटाचे नाव उज्वल केले, असे प्रशंसोद्गार आम.जयंत पाटील यांनी काढले.
चौकीचापाडा वाळवडे ग्रामस्थांतर्फे प्रतीक चंद्रशेखर जुईकर यांचा नागरी सन्मान पांडवादेवी येथील पाटील ब्रदर्स या भव्यदिव्य हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमात प्रतीक जुईकर यांचे आजोबा, आजी व आई वडील यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास समस्त वाळवडे, चौकीचापाडा ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन चौकीचापाडा, वाळवडे ग्रामस्थांनी केले असून कार्यक्रम संपन्न करण्याकरीता अध्यक्ष बाळूशेठ पाटील, उपाध्यक्ष शशांक म्हात्रे यांच्यासह संपूर्ण दोन्ही गावचे ग्रामस्थांनी एकत्र येऊन केले.
आ.जयंत पाटील यांनी प्रतीक जुईकर यांच्या पुढील शिक्षणासाठी एक लाख रुपयांचा धनादेश जाहीर केला. प्रतीक जुईकर यांनी आपल्या मनोगतातून तरुण पिढीला मोबाईल, व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवण्यापेक्षा आपल्या देशाचा कसा लौकीक वाढेल याकडे लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन जगदीश पाटील सर व प्रतिभा पाटील यांनी केले.