मंगळसूत्र खेचून चोर पसार

| पनवेल | वार्ताहर |

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून दोघेजण दुचाकीवरून पळून गेले. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.आदिती सिंग या कामोठे येथे राहत असून त्या घरी जात असताना मालवण तडका हॉटेल, कामोठे येथे पोहोचल्या. यावेळी पाठीमागून काळ्या रंगाच्या एटीएम मोटरसायकलवरून दोन अनोळखी इसम आले. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून ते पळून गेले. मंगळसूत्र खेचून नेल्याप्रकरणी चोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version