| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल-उरण रेल्वे रेल्वे ट्रॅकला लागून असलेल्या साईटवर गव्हाणफाटा परिसरात 3 लाख रुपये किमतीची कॉपर केबल चोरून नेणाऱ्या एका आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या आणखी तीन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
आरोपी शिवप्रसाद गौतम (20), रा. दिवाळे गाव याने अनिल, अवधेश व आणखी एका इसमाने आपसात संगनमत करुन पनवेल-उरण रेल्वे रेल्वे ट्रॅकला लागून असलेले साईटवर गव्हाणफाटा परिसरात असलेली तीन लाख रुपये किमतीची 77 मीटर लांबी असलेली कॉपर केबल कापून नेली. तसेच दोन मशीनचेदेखील नुकसान केले. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांकडे तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे तसेच हेड कॉन्स्टेबल योगेश दिवेकर यांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीदाराच्या साथीने आरोपी शिवप्रसाद गौतमला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 56 हजार रुपये किमतीची 14 मीटर लांबीची कॉपर केबल तसेच पाच लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी डिझायर गाडी जप्त केली आहे. त्यांच्या आणखी तीन साथीदारांचा शोध हेड कॉन्स्टेबल योगेश दिवेकर करीत आहेत.







