मच्छिमारांचे आंदोलन मिटविण्यासाठी तातडीने बैठक बोलवा – आ. जयंत पाटील

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जाचक अटी व शर्तीमुळे 120 पेक्षा उच्च अश्‍वशक्ती असलेल्या नौकांचा डिझेल कोटा मंजूरीस स्थिगिती दिलेली असल्यामुळे त्यांना शासनाकडून डिझल परतावा मिळणार नाही व इतर विविध कारणांमुळे मच्छिमारांमध्ये असंतोषाचे वातावरण असून त्याविरोधात रायगड जिल्हा मच्छिमार संघामार्फत दि आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेले धरणे आंदोलन सोडविण्यासाठी बैठक घेण्यात यावी यासाठी पॉईट ऑफ इन्फरमेशन द्वारे आ जयंत पाटील यांनी सभागृहात निदर्शनास आणली. रायगड जिल्हा मच्छिमार सहकारी संघ मर्या. रायगड अलिबाग हा संपूर्ण जिल्ह्यातील मच्छिमार संस्थांचा शिखर संघ म्हणून कार्यरत आहे. सध्या जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवरील सामान्य मच्छिमार हा विविध वादळे, टाळेबंदी, मत्स्यदुष्काळ इत्यादीमुळे भरडला जात आहे. त्यातच शासनाने जारी केलेल्या नव्या सुधारीत अधिनियमामु व त्यातील जाचक अटी व शर्तीमुळे सामान्य मच्छिमारांच्या अडचणीमध्ये आणखी भर पडली आहे.

शासनाने लागू केलेल्या जाचक अटी व शर्तीमुळे 120 पेक्षा उच्च अश्‍वशक्ती असलेल्या नौकांचा डिझेल कोटा मंजूरीस स्थिगिती दिलेली असल्यामुळे त्यांना शासनाकडून डिझल परतावा मिळणार नाही व इतर विविध कारणांमुळे मच्छिमारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्यातील सागरी मच्छिमारांच्या ज्वलंत समस्या सोडविण्यासाठी जिल्हा संघामार्फत 8 मार्च 2022 रोजी आझाद मैदान मुंबई येथे भव्य धरणे आंदोलन करित असून सदर त्यांच्या मागण्यांना न्याय देवून त्यांचे आंदोलन सोडविण्यात यावे व आपल्या दालन संदर्भात बैठक घेण्यात यावी यासाठी मी ही बाब पॉईट ऑफ इन्फरमेशन द्वारे सदर बाब उपस्थित करीत आहे. या महत्वपूर्ण प्रकरणावर शासनाने निवेदन करण्याची मागणी आ जयंत पाटील यांनी केली.

Exit mobile version