पदवीधर मतदार संघ नोंदणीचे आवाहन

| रायगड | प्रतिनिधी |

पदवीधर मतदार संघाच्या अनुषंगाने 1 नोव्हेंबर 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत नॉव्हेंबर 2023 या कालावधीत पदवीधर मतदार नोंदणी सुरु आहे. तरी ज्या मतदारांनी दिनांक 1 जानेवारी 2020 पूर्वी पदवी प्राप्त केली आहे. ते मतदार पदवीधर मतदारसंघा करीता नाव नोंदविण्यास पात्र आहेत.

पदवीधर मतदार नोंदणीऑनलाईनपद्धतीने संकेतस्थळावर लिंकद्वारे नोंदणी अर्ज उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जे मतदार पदवीधर मतदारसंघामध्ये मतदार नोंदणी करण्यास इच्छुक आहेत. त्यांनी नमुना नं.18 अर्ज भरुन घ्यावे अथवा ऑनलाईन पद्धतीने नमुना नंबर 18चा अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रासहीत तहसिलदार कार्यालय पनवेल येथे जमा करावेत. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे सदर कागदपत्रांवर राजपत्रिय अधिकारी/पब्लीक नोटरी साक्षांकन असणे आवश्यक आहे. पदवीधर मतदारसंघ नाव नोंदणी मोहीम कोंकण आणि मुंबई विभागासाठी नोंदणी करणारा मतदार हा 30 ऑक्टोबर 2020 पूर्वी पदवीधर झालेला असावा. त्यानंतर पदवीधर झाला असेल त्यांनी फॉर्म भरू नये. पदवी परिक्षेचा निकाल घोषित झालेला दिनांक 3 वर्षांची मुदत ठरविताना विचारात घेतला जाईल.

आवश्यक कागदपत्रे
1. पदवी किंवा पदवी समकक्ष धारण केलेली मार्कशिट किंवा पदवी प्रमाणपत्र, 2. आधार कार्ड, 3. इलेक्शन कार्ड, 4. रेशन कार्ड किंवा लाईट बिल, 5. नावात बदल असल्यास लग्न प्रमाणपत्र किंवा गॅझेट कॉपी, 6. मतदार हा पदवीधर मतदार संघातील रहिवासी असावा, 7. एक पासपोर्ट साइज कलर फोटो, 8. सर्व झेरॉक्स वर आपली सही करावी.

पनवेल तालुक्यातील सर्व पात्र पदवीधारकांनी जास्तीत जास्त प्रमाणात कोकण पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी असे आवाहन पदनिर्देशित अधिकारी, कोकण पदवीधर मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी पनवेल श्री.राहुल मुंडके यांनी केले आहे.

Exit mobile version