‘वंचित’चे स्वाक्षरी मोहीम राबवून आंदोलन
| कर्जत | प्रतिनिधी |
वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या आदेशाने जिल्हा महासचिव धर्मेंद्र मोरे नेतृत्वाखाली कर्जत-नेरळ येथे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात ईव्हीएमविरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्या-टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना ईव्हीएमविरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. ईव्हीएमच्या विरोधात न्यायालयीन लढाईसुद्धा ते लढत आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ईव्हीएम वापरामधील अनेक घोळ त्यांनी माध्यमासमोर मांडले आहेत. ईव्हीएमच्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे.
या आंदोलनात रायगडमधल्या जागरुक मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने सामील व्हावे, असे आव्हान रायगड जिल्हा महसचिव धर्मेंद्र मोरे यांनी केले होते. त्याच आवाहनाला कर्जतमध्ये हजारो लोकांनी स्वाक्षरी करून ईव्हीएम विरोध नोंदवला. सदर स्वाक्षरी मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा महासचिव धर्मेंद्र मोरे, जिल्हा सल्लगार हरिश्चंद्र यादव, जिल्हा संघटक सुनील गायकवाड, तालुका महसचिव प्रदीप ढोले, तालुका उपाध्यक्ष आनंद खैरे, कर्जत शहर अध्यक्ष लोकेश यादव, नेरळ शहर अध्यक्ष मुकेश गायकवाड, सचिव संजय मोरे, संघटक प्रथमेश पवार, प्रज्ज्वल गायकवाड आदींनी मेहनत घेतली.