| अलिबाग | प्रतिनिधी |
विशेष घटक व नाविन्यपूर्ण योजना व इतर योजनेंतर्गत दुधाळ जनावरांचा (गायी, म्हशी) पुरवठा करण्यासाठी जिल्हानिहाय पुरवठादारांचे पॅनल करण्यात येणार आहे. इच्छुक पुरवठादारांकडून यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय इमारत, प्राणायाम हेल्थ समोर वरसोली रोड, रामनाथ, अलिबाग, दूरध्वनी क्रमांक 02141-228036 येथे तसेच तालुका पशुसंवर्धन कार्यालयाच्या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. आर.व्ही.काळे यांनी केले आहे.