मुख्यमंत्री माझी बहीण योजनेसाठी कॅम्प

| नेरळ | प्रतिनिधी |

राज्य सरकारने आपल्या अतिरिक्त अर्थ संकल्पात राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माझी बहीण योजनेमधून दरमहा 1500 रुपयांचे अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी कर्जत तालुका तहसील कार्यालय तसेच सेवा केंद्र यांच्या कार्यलयानाच्या बाहेर आणि तलाठी कार्यालय तसेच ग्रामपंचायत कार्यालये महिलांनी दुमदुमून गेली आहेत.

महिला वर्गाची धावपळ कमी करण्यासाठी राजकीय पक्षांनी शिबिरांचे आयोजन केले आहे. सामाजिक संस्थांच्यावतीने प्रत्येक जिल्हा परिषद गटासाठी तर काही राजकीय पक्षांनी आपल्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत हि सेवा उपलब्ध करून दिली आहे. 50 टक्के महिलांची संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र्र सरकारने देखील अशी योजना महाराष्ट्र राज्यात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 50 टक्के महिला मतदार यांना अनुदानाचा लाभ देऊन महिलांचा विश्वास निवडणुकीच्या काळात मिळविण्याचा सर्वात मोठा प्रयत्न महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार उचलण्याच्या प्रयत्न करत आहे. त्यासाठी हि योजना जाहीर झाल्यानंतर राज्यातील प्रत्येक तालुका मुख्यालये महिलांच्या गर्दीने भरून गेली आहेत. अशावेळी महिलांची धावपळ तालुका तहसील कार्यालय, तालुक्यातील तलाठी कार्यालये तसेच सेतू केंद्र, सेवा कार्यालये आणि ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर गर्दी दिसून येत आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांना दिवसभर ताटकळत राहावे लागत आहे. त्याचवेळी अनेक महिला आपल्या लहान मुलाबाळांना सांभाळत दिवसभर अर्ज भरून घेण्यासाठी थांबावे लागत आहे. या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. मात्र प्रशासनाकडून विशेष अशा कोणत्याच सुविधा महिलांसाठी देण्यात न आल्याने नाराजीचा सूर आहे.

दरम्यान, तहसिल, सेतु कार्यालयात मोठ्या प्रमाणात अर्ज भरण्यात येत असल्याने दलांलाचे चांगलेच फावत आहे. तसेच लिहानावळ वाले, झेरॉक्स सेंटर यांचा व्यवसाय देखील यामुळे तेजीत आला आहे. पुढील महिनाभर अशीच परिस्थीती कायम राहणार असल्याचे सध्या चित्र दिसत आहे.

Exit mobile version