‘लाडकी बहीण’साठी अर्ज भरण्याचे शिबीर

| चिरनेर | प्रतिनिधी |

शासनाने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा महिलांना लाभ मिळावा, यासाठी चिरनेर गावात चिरनेर ग्रामपंचायतीच्यावतीने व उरण तहसील कार्यालयाच्या सहकार्याने दि. 11 व 12 जुलै रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 या कालावधीत या योजनेचे अर्ज भरण्याच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय शिबिरात अर्ज भरले जाणार आहेत.

21 ते 65 या वयोगटातील महिलांना या योजनेतून आर्थिक लाभ मिळणार आहे. हा लाभ घेण्यासाठी शासनाने मागितलेली कागदपत्रे जमा करण्यासाठी महिलांना मोठी धावपळ करावी लागत आहे. यासाठी चिरनेर गावात चिरनेर ग्रामपंचायतीच्यावतीने व उरण तहसील कार्यालयाच्या सहकार्याने अर्ज भरण्याच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सरपंच भास्कर मोकल व उपसरपंच सचिन घबाडी यांनी दिली.

Exit mobile version