। पोयनाड । प्रतिनिधी ।
पोयनाड येथे जिल्हाधिकारी कार्यालय रायगड व तहसील कार्यालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने पोयनाड मंडळअधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थींसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
उपस्थित सर्व लाभार्थीं यांचे अर्ज भरून घेणे व कागदपत्रांची पूर्तता करणे याकरिता मंडळ अधिकारी पोयनाड महेश निकम व मंडळ अधिकारी चरी सूर्यकांत विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोयनाड मंडळ अधिकारी कार्यालयातील विविध सजांचे सर्व तलाठी, ग्रामसेवक, केंद्रचालक, कोतवाल, अंगणवाडी सेविका व विभागातील बचतगटाच्या महिलांनी लाभार्थीना फॉर्म भरण्यासाठी सहकार्य केले.ताडवागळे येथील प्रीमियम कंपनीचे व्यवस्थापक दर्शन म्हात्रे यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी व लाभार्थींसाठी मोफत अल्पोपहाराची व्यवस्था केली. प्रत्येक मंडळ कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थींसाठी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे,उप विभागीय अधिकारी अलिबाग मुकेश चव्हाण व अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील हे शिबिराचे आयोजक म्हणून मार्गदर्शन करीत आहेत.






