। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरूड वसंतराव नाईक महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना मार्फत तेलवडे येथे सात दिवसीय श्रम संस्कार शिबिराचे उद्घाटन वसंतराव नाईक महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. श्रीशैल बहीरगुंडे यांनी शिबिराच्या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येत असलेल्या पाणलोट व्यवस्थापन, पाणी अडवा पाणी जिरवा, वनराई बंधारे, फळबाग लागवड, वृक्ष संवर्धन व पर्यावरण संवर्धन याबद्दल माहीती दिली.
माजी प्रभारी प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवले आहेत. तसेच स्वयंसेवकांना सामाजिक समस्येची जाणीव निर्माण व्हावी हा राष्ट्रीय सेवा योजनेचा हेतू आहे, असे मत व्यक्त केले. निलेश तांबडकर यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व्यक्तीमत्व विकास या शिबिरातून आदर्श विद्यार्थी घडवा, असे आव्हान केले. महाविद्यालय विकास समितीच्या सदस्य वासंती उमरोटकर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट, राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास, राष्ट्रीय सेवा योजनेचा लोगो या बद्दल परिपूर्ण माहिती दिली.
यावेळी कल्पना पवार, निलेश तांबडकर, कृष्णा म्हात्रे, प्रमोद तांबडकर, विलास पाटील, कमल वारगे, परशुराम वाघमारे, भालचंद्र पाटील, वासंती उमरोटकर, संदेश दांडेकर, डॉ. जनार्दन कांबळे, डॉ. श्रीशैल बहीरगुंडे, डॉ.गजानन मूनेश्वर, तेलवडे गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, गावातील महिलामंडळ महाविद्यालयातिल प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंतरा माळी हिने केले तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सुजल गायकर यांनी केले.
