बरडावाडी येथे आशासेविकांचे शिबीर

| पेण | वार्ताहर |
डॉ.जी.डी.पोळ फाउंडेशन व वायू.एम.टी आयुवैदिक कॉलेज व रुग्णालय, साकव संस्था व पंचायत समिती पेण यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना साथीत काम करणार्‍या आशासेविकासाठी मार्गदर्शक शिबीर बरडावाडी येथे आयोजित करण्यात आले होते.

प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन करताना पेण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी एम.एम.गढरी यांनी केले .यावेळी त्यांचे हस्ते बरडावाडी येथील लखन नथु वाघमारे या 78 वर्षे वयाच्या वृध्दाने लसीकरण केल्याबद्दल त्यांचा श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. यावेळी उप प्राचार्य डॉ. निनाद साठे यांनी मार्गदर्शन केले. साकव संस्थेचे सचिव अरूण शिवकर यांनी सुचविल्या प्रमाणे हया आशा वर्कर यांचेसाठी प्रशिक्षण घेण्यात आले आहे.

या शिबिराला बेणसे, आमटेम, खारपाले, देवळी, वरप,जिर्णे, पाबल या भागातील 24 आशासेविका सहभागी झाल्या होत्या.डॉ. मंदार कर्वे, डॉ. विराज केळकर, डॉ. दीप्ती कदम, डॉ. ज्योती जंगले, डॉ. अभिजीत घाडगे, डॉ. प्रेमानंद यांनी मार्गदर्शन केले. हे शिबिर समाप्ती नंतर आशा वर्कर पैकी मिनाक्षी कदम हिने सर्वाचे आभार मानले. हे शिबिर यशस्वी करणे करीता साकव संस्थेचे कार्यकर्त्ये मंजुळा पाटील, प्रभाकर ठाकूर, माणिकराज गावंड, उमेश दोरे, लक्ष्मण केणी यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version