| माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे दोशी वकील आर्ट्स कॉलेज अँड जी.सी.यु.बी. सायन्स अँड कॉमर्स कॉलेज गोरेगाव-रायगड येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय निवासी शिबिर मु. कुशेडे, पो. वडवली, ता. माणगाव येथे उत्साहात सुरू झाले. या शिबिराचा कालावधी 24 ते 30 नोव्हेंबर असा होता.
उदघाटनासाठी गोरेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण नावले हे होते. यावेळी शांतीलाल मेथा, दिलीप शेठ, प्राचार्य डॉ. जनार्दन होटकर, राम म्हसकर, संजय भुवड ,नरेश आग्रे, अविना मोरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. सुभाष कदम यांनी केले तर आभार डॉ. भारत खराडे यांनी मानले. या शिबिरामध्ये 100 स्वयंसेवकांनी भाग घेतला आहे.