स्व. प्रभाकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिबीर

| अलिबाग | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यात नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील श्रीपंत भक्त मंडळ संचलित गुरूवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठानने रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते स्व. प्रभाकर पाटील (भाऊ) यांच्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही पेझारी येथील श्रीदत्त मंदिर सभागृहात रविवार, 22 जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. यंदा या रक्तदान शिबिराचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे, अशी माहिती श्रीपंत सांप्रदाय रायगड जिल्हाप्रमुख व प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिगंबर राणे यांनी दिली.

हे रक्तदान शिबीर पेझारी येथील श्रीदत्त मंदिर सभागृह येथे सकाळी 10 ते 2 या वेळात होणार आहे. गेली 24 वर्षे सातत्याने प्रतिष्ठान रक्तदान शिबिराचे आयोजन करत असून यंदाचे शिबिराचे हे 25 वे वर्ष आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार जयंत पाटील व माजी आमदार पंडित पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी झेप फाऊंडेशनच्या अध्यक्षा व माजी राजिप सदस्या चित्रा पाटील, राजिप माजी सदस्या भावना पाटील, राजिपचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील, आंबेपूर सरपंच सुमना पाटील, युवा नेते सवाई पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून या सामाजिक कार्यास हातभार लावावा, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिगंबर राणे यांनी सांगितले आहे. इच्छुक रक्तदात्यांनी दिगंबर राणे 9422371098, दिनानाथ कडू 9422695039, निकेश पाटील 9834766156, मुकुंद म्हात्रे 9226370771, नरेश म्हात्रे 9309507342, सुमित राणे 9028414613 यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version