अक्षया नाईक, निलम हजारे, अनिल चोपडा यांचे जल्लोषात स्वागत
बाजारपेठ परिसरातील मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग आठमधून ॲड. निलम किशोर हजारे आणि अनिल रमेश चोपडा उभे राहिले आहेत. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षया नाईक यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार निलम हजारे आणि अनिल चोपडा यांनी बुधवारी(दि.19) सायंकाळी मिरची गल्ली येथील विठ्ठल रखूमाईचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. या प्रचाराला त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. असंख्य कार्यकर्ते, महिला प्रचारात सहभागी झाले होते.
अलिबाग नगर परिषद हद्दीतील प्रभाग आठ (अ)मधील नगरसेवक पदाच्या उमेदवार ॲड. निलम हजारे तसेच प्रभाग आठ (ब) मधील नगरसेवक पदाचे उमेदवार अनिल चोपडा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराला सुरुवात केली. बुधवारी सायंकाळी प्रचाराचा शुभारंभ माजी उपनगराध्यक्षा सुरक्षा शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. सुरुवातीला विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रचाराला सुरुवात केली. मिरची गल्लीसह बाजारपेठ परिसरातील मतदारांना प्रत्यक्ष भेटून त्यांना मतदान करण्याचे आवाहन अक्षया नाईक, निलम हजारे आणि अनिल चोपडा यांनी केले.यावेळी मतदारांकडून त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.या उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी अलिबाग नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा सुरक्षा शहा, अमृता रानडे, अर्चना शहा, पुर्वा वेदक, अश्वीन लालन, रवि थोरात,ॲड. अशिष रानडे, प्रकाश राठोड, दत्तात्रेय जाधव आदी उपस्थित होते.
शेकाप, काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार नवे विचार, व्हीजन, विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. या उमेदवारांच्या प्रचाराला मंगळवारपासून सुरुवात झाली. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच या उमेदवारांना मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले. सर्व उमेदवारांचे हसतमुखाने मतदारांनी स्वागत केले.
