प्रविणा घासे आणि प्रिया ढवळे यांच्या प्रचाराला उत्स्फुर्त प्रतिसाद
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चेंढरे जिल्हा परिषद मतदार संघातील शेकाप व महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रविणा घासे तसेच चेंढरे पंचायत समिती मतदार संघातील उमेदवार प्रिया ढवळे यांचा गृहभेटीतून प्रचाराचा झंझावात सुरु आहे. रविवारी (दि.1) चेंढरे, गोंधळपाडा, शिवनगर, चेवलेनगर, स्वामी समर्थ नगर या परिसरात घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला. प्रचाराच्या दरम्यान उमेदवारांचे मतदारांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी दत्ता ढवळे, संदीप ढवळे, ॲड. परेश देशमुख, प्रशांत फुलगांवकर, दिलीप मानकर, ममता मानकर, रेखा चिमणे, सुभाष घनवट, किशोर पाटील, विलास म्हात्रे, नाना घरत, विरेंद्र साळवी, मिनल माळी, जितेंद्र वाघ, नागेश्वरी हेमाडे, अनिल चिमणे, महेश पवार, लक्ष्मण पवार, तेजस ढवळे, हर्ष ढवळे, निरज ढवळे, पंकज ढवळे, सतिश देशमुख, अशिष तरे, वरद सालीमठ, चंद्रकांत घरत, मरुआई नगरचे कार्यकर्ते तसेच सर्व पदधिकारी, कार्यकर्ते, महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीचे मतदान येत्या शनिवारी(दि. 7) फेब्रुवारीला आहे. त्या निमित्ताने शेकाप महाविकास आघाडीच्या चेंढरे जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार प्रविणा घासे तसेच चेंढरे पंचायत समिती मतदार संघातील उमेदवार प्रिया ढवळे या निवडणूकीच्या रिंगणात उभ्या आहेत. या मतदार संघातील गावे, वाड्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्रचार सुरु आहे. प्रविणा घासे आणि प्रिया ढवळे यांचा प्रचार रविवारी(दि.1) सकाळी चेंढरेसह गोंधळपाडा, शिवनगर, चेवले नगर, स्वामी समर्थ नगर,परिसरात करण्यात आला. घरोघरी जाऊन मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. खटारा या चिन्हा समोरील बटण दाबून मतदान करा असे सांगितले जात आहे. शेकाप व महाविकास आघाडीच्या या प्रचाराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही उमेदवारांचे जल्लोषात स्वागत केले जात आहे. त्यामुळे या निवडणूकीत शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला.






