चिन्ह वाटपानंतर प्रचाराला वेग

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा शनिवारी (दि.3) पूर्ण झाला आहे. उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आल्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेतील निवडणूक लढतीचे खरे चित्र स्पष्ट झाले आहे.
निवडणूक चिन्हांच्या वाटपात राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांच्या पारंपरिक चिन्हांसह अपक्ष व छोट्या पक्षांच्या विविध चिन्हांचा समावेश आहे. त्यात कमळ, हात, धनुष्यबाण, खटारा, मशाल, तुतारी वाजवणारा माणूस, घड्याळ, रेल्वे इंजिन, सायकल, हत्ती यांसारख्या ओळखीच्या चिन्हांबरोबरच पुस्तक, कपबशी, शिट्टी, सिमला मिरची, स्टेपलर, गॅस सिलिंडर, झाडू, फुटबॉल, हेलिकॉप्टर व किटली अशी अनेक चिन्हे यंदाच्या निवडणुकीत मतदारांच्या समोर असणार आहेत. चिन्हांचे वाटप होताच निवडणूक प्रचाराला वेग आला आहे.

Exit mobile version