आवासमध्ये प्रचाराला सुरुवात

| अलिबाग | प्रतिनिधी |

आवास ग्रामपंचायतीच्या थेट सरंपच व सदस्य पदाच्या निवडणूकीसाठी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रचाराला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने या निवडणुकीत विजय निश्चित होण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

आवास येथील जागृत देवस्थान नागेश्वर मंदिरात नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी शेकापचे थेट सरपंच पदाचे उमेदवार सुषमा सुरेंद्र कवळे, सदस्य पदाचे प्रभाग एकमधील उमेदवार जगन्नाथ वामन घरत, रुचा रुपेश राणे, प्रभाग दोनमधील विजय छगन राणे, अपुर्वा अरूण राणे, प्रभाग तीनमधील वसुधा विजय राणे, प्रभाग चारमधील राजन रामचंद्र पाटील, स्वाती सुधाकर राणे हे उमेदवार उपस्थित होते. आवास ग्रामपंचायत हद्दीत आवास, सुरेखार, इंद्रपै, टेकाळी, रांजणपाडा या गावे, वाड्यांचा समावेश आहे. सुमारे चार हजार मतदार आहे.

पाणी, मुलभूत सुविधा, स्वच्छता, वीज, पर्यावरण अशा वेगवेगळ्या मुद्द्यावर ही निवडणूक लढविली जाणार आहे. आवासनंतर बुधवारी रांजणपाडा येथे प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी गावदेवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेण्यात आले. यावेळी आवासचे माजी सदस्य मच्छींद्र कवळे, सर्व उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते. मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. त्याला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Exit mobile version