लोहोप येथे कर्करोग निदान शिबीर

| रसायनी | वार्ताहर |

रसायनी पाताळगंगा औद्योगिक परिसरातील बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने टाटा स्मारक केंद्र व बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तर्फे लोहोप येथे मोफत कर्करोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी नागरिकांना कर्करोग आजारांवर तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन करुन तपासणी केली. या शिबिरात उपस्थित असलेल्या महिलावर्गांला प्लास्टिक बंदीवर जनजागृती करण्यात आली व कापडी बॅग वाटप करण्यात आले. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्लास्टिक बंदी महत्वाची असल्याने पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अरुण जाधव यांनी बोलताना सांगितले. याप्रसंगी उपस्थित रवींद्र रघुवंशी प्लांट हेड बिर्ला कार्बन, निखिल भामरे एच आर मॅनेजर बिर्ला कार्बन इंडिया प्रा. लिमिटेड पाताळगंगा, अरुण गोविंद जाधव अध्यक्ष पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट, लक्षण मोरे, डॉ. सोनाली तेलंगे, डॉ. अदिती डे, डॉ. सीमा पाईकराव, डॉ. अंकिता म्हात्रे, समित रथ, हरीश रावत इत्यादी उपस्थित होते.

Exit mobile version