पेण | प्रतिनिधी |
रोटरी पेण ओरायन, सीएफआय आणि जिवीका फाउंडेशन यांच्या माध्यमातून गर्भाशयग्रीवा कॅन्सर लसीकरण अभियान दोन टप्प्यात राबवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 250 लाभार्थी आणि दुसऱ्या टप्प्यात 250 लाभार्थी असणार असून यामध्ये 9 ते 14 वयोगटातील मुलींचा समावेश आहे. याचा पहिला टप्पा पेण अंबिका मंदिराच्या पटांगणावर घेण्यात आला. यामध्ये 250 मुलींनी आपली नाव नोंदणी केली.
गर्भाशयाच्या कॅन्सरच्या लसीकरणाचे डोस हे सध्या बाजारात चार हजार रुपयापर्यंत मिळतो. अशा 250 मुलींना हा डोस देण्यात येणार असून यासाठी रोटरी पेण ओरायनच्या अध्यक्षा डॉ. सोनाली वनगे, प्रोजेक्ट मॅनेजर डॉ.स्वाती चौधरी, सदस्य पर्णल कनेकर, डॉ. मनिष वनगे, सीएफआयचे डॉ. किशोर देशमुख, चंद्रकांत साळवी, वैष्णवी पेठकर, प्रियंका साळूंखे, मिताली गावंड तसेच जिविका फाउंडेशनचे सदस्य अदींनी हा पहिला लसिकरणाचा टप्पा यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली. तर या अभियानाचे शुभारंभ प्रितम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक संतोष पाटील उपस्थित होते.