| पाली/बेणसे | वार्ताहर |
देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागलेत. राज्यात महाविकास आघाडीशी न जुळल्याने वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांची मोठी खेळी दिसून आली. मराठा समाजाच्या कुमुदिनी चव्हाण यांना उमेदवारी सोपवल्याने रंगत वाढली आहे. महायुती आणि इंडिया आघाडीच्या प्रमुख पक्षाविरोधात वंचित आघाडीने ही उमेदवार दिल्याने तिरंगी लढतीचा सामना रंगणार आहे.
महायुतीचे सुनिल तटकरे, महाविकास आघाडीचे अनंत गिते यांच्या लढतीत आता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी रायगड लोकसभा उमेदवार म्हणून महाडमधील कुमुदिनी चव्हाण यांना जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार चव्हाण यांचा मतदारसंघात प्रचाराचा जोरदार सुरु आहे. महाडच्या चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणी छ. शिवाजी महाराज यांना अभिवादन करून प्रचाराला सुरवात करण्यात आली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महिलेला दुसऱ्यांदा उमेदवारी वंचितने दिली आहे. कुमुदिनी चव्हाण यांचा जन्म पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्याच्या जवळ ओतूर गावात प्राध्यापक आर, बी, डुंबरे व आई कृष्णाबाई डुंबरे पाटील यांच्या त्या कन्या आहेत. रवींद्र चव्हाण हे पती असून वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहेत. कुमुदिनी चव्हाण ह्या उच्च शिक्षित असून महाड येथे मॉडर्न इंग्लिश स्कूल नावाने इंग्रजी माध्यमाची शाळा चालवत आहेत.