निवडणूक निर्णय अधिकार्यांचे आवाहन
| अलिबाग | वार्ताहर |
विधानसभेची निवडणूक लढविणार्या प्रत्येक उमेदवाराला निवडणूक निकालाच्या तीस दिवसांच्या आत उमेदवाराने किंवा त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीने ठेवलेल्या निवडणूक खर्चाचा हिशेब खर्च निरीक्षकांकडे दाखल करणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी निवडणूक खर्चाशी सबंधित इतर अनुषंगिक कागदपत्रे/दस्तावेज खाली दिलेल्या तारखांना निवडणूक खर्च निरीक्षक यांच्यासमोर तपासणीकरिता सादर करावीत, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे. खर्चाच्या नोंदवहीमध्ये नोंदविलेल्या लेख्यांची तपासणी, निवडणूक खर्चावर देखरेख सूचनांचा सारसंग्रह प्रचार कालावधीत किमान तीन वेळा होणे आवश्यक आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक उमेदवारांच्या खर्च नोंदवह्यांची तपासणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
त्यानुसार 192-अलिबाग विधानसभा मतदारसंघात एकूण 14 अधिकृत उमेदवार असून, अंतिम झालेल्या उमेदवारांनी खर्च नोंदवही, निवडणूक खर्चासाठी उघडलेली स्वतंत्र बँक खाते पासबुक, निवडणूक खर्चाची प्रमाणके व उपप्रमाणके, रोख रक्कम तपशील इत्यादी व निवडणूक खर्चाशी संबंधित इतर अनुषंगिक कागदपत्रे/दस्तावेज निवडणूक खर्च निरीक्षक यांच्यासमोर तपासणीकरिता सादर करावीत, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी केले आहे. अलिबाग विधानसभा श्रीम.ज्योती मीना हे उमेदवारांच्या खर्च नोंदवह्यांची तपासणी प्रथम, दि.08 नोव्हेंबर, सकाळी 11.00 वा., द्वितीय, दि.12 नोव्हेंबर सकाळी 11 वा., दि.17 नोव्हेंबर सकाळी 11.00 वा.,स्थळ:- अलिबाग नगर परिषद, दुसरा मजला, अलिबाग ता.अलिबाग येथे होणार आहे.
189-कर्जत विधानसभा मतदारसंघात एकूण 09 अधिकृत उमेदवार असून, अंतिम झालेल्या उमेदवारांनी खर्चाशी संबंधित कागदपत्रे खर्च निरीक्षक यांच्यासमोर तपासणीकरिता सादर करावीत, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी केले आहे. खर्च निरीक्षक, रमेश कुमार हे उमेदवारांच्या खर्च नोंदवह्यांची तपासणी प्रथम, दि.10 नोव्हेंबर दुपारी 3 ते सायंकाळी 6.30, द्वितीय, दि.14 नोव्हेंबर दुपारी 3 ते सायंकाळी 6.30, तृतीय, दि.18 नोव्हेंबर दुपारी 3 ते सायंकाळी 6.30, स्थळ:- प्रशासकीय भवन, पोलीस ग्राऊंडच्या शेजारी कर्जत ता.कर्जत. येथे होईल.
193-श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी खर्चाशी संबंधित निवडणूक खर्च निरीक्षक यांच्यासमोर तपासणीकरिता सादर करावीत, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांनी केले आहे. निवडणूक खर्च निरीक्षक, सतीश कुमार एस हे उमेदवारांच्या खर्च नोंदवह्यांची पहिली तपासणी, दि.09 नोव्हेंबर, दुसरी तपासणी दि.12 नोव्हेंबर, तिसरी, दि.17 नोव्हेंबर रोजी श्रीवर्धन मध्यवर्ती प्रशासकीय भवन, ता.श्रीवर्धन येथे करणार आहेत. 190-उरण विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी निवडणूक खर्चाशी सबंधित कागदपत्रे, दस्तावेज तपासणीकरिता सादर करावीत, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन कासार यांनी केले आहे. निवडणूक खर्च निरीक्षकरमेश कुमार हे उमेदवारांच्या खर्च नोंदवह्यांची तपासणी प्रथम, दि.9 नोव्हेंबर दुपारी 3 ते सायंकाळी 6.30, द्वितीय, दि.13 नोव्हेंबर दुपारी 3 ते सायंकाळी 6.30, तृतीय, दि.17 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6.30 यावेळेत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जासई, ता. उरण येथे करणार आहेत. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.