वावोशीत मराठा आरक्षणासाठी कॅण्डलमार्च

| वावोशी | वार्ताहर |

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. अनेक जिल्ह्या व तालुक्यामध्ये साखळी उपोषण केले जात आहेत याच अनुषंगाने वावोशी विभागातून देखील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज बांधवांकडून कँडल मार्च काढण्यात आला.

यावेळी आपल्या मराठा समाज बांधवांना पाठिंबा देण्यासाठी वावोशी व इतर परिसरातील मराठा तसेच सर्व जातीय बांधव देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत वावोशी गाव ते वावोशी फाटा असा कँडल मार्च काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व जातीच्या समाजबांधवांनी मराठा आरक्षण या विषयावर मार्गदर्शनपर वक्तव्य करीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला. आम्हाला जरी आरक्षण मिळाले नसले तरी आमच्या पुढच्या पिढीला चांगल्या प्रकारचे उच्च प्रतीचे शिक्षण, सरकारी नोकरी मिळाव्यात याकरिता आम्हाला आरक्षणाची गरज आहे, असे प्रतिपादन शिक्षिका गीता पाटील यांनी केले तर आम्हाला जी भाकरी मिळते त्यामधील अर्धी भाकरी ही आमच्या मराठा बांधवाला देखील मिळाली पाहिजे तरच पुढची पिढी आनंदात नांदेल, असे प्रतिपादन ओबीसी समाजाचे वावोशीचे माजी सरपंच राजू शहासने यांनी केले. आरक्षणासाठी शासनाने आमची परीक्षा न घेता लवकर निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना नेते विजय पाटील यांनी केले.

यावेळी या कँडल मार्च मध्ये माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना नेते विजय पाटील, वावोशी चे माजी सरपंच राजू शहासने, गोरठण ग्रामपंचायत सरपंच किशोर पाटील, सामाजिक कार्यकर्ते एल बी पाटील, शांताराम हडप, सीताराम पाटील, छावा संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष तानाजी शिंदे, राजू अढावकर, राकेश जाधव, ॲड रमेश पाटील, दिनेश मोरे, महेश कडू, भगवान ढेबे, भालचंद्र पाटील, पद्माकर धारवे, नंदू शहासने, रंजना कडू, गीता पाटील, मानसी पाटील आदी वावोशी, गोरठण बुद्रुक व इतर परिसरातील लहान थोरांपासून, महिला, अबाल वृद्ध असे सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version