अ‍ॅमेझॉनवरून गांजाची विक्री

। मध्यप्रदेश । वृत्तसंस्था ।
आधुनिक युगासोबत ई-कॉमर्स ही प्रणाली प्रगत होत असून, सद्यःस्थितीत विविध अवैध प्रकारामुळे या प्रणालीस गालबोट लागत आहे. अशाच काही घटनांचे ताजेपण लोप पावत असतानाच, अ‍ॅमेझॉनमार्फत गांजा तस्करीचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे.
विश्‍वसनीय सुत्रांच्या माहितीनुसार, कल्लू नामक एका व्यक्तीने विशाखापट्टणम येथे बनावट पॅन क्रमांक आणि जीएसटी क्रमांकासह ऑनलाइन ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनवर कढीपत्ता विकण्यासाठी आपल्या फर्मची नोंदणी केली होती. याद्वारे ग्वाल्हेर, भोपाळ, कोटा, आग्रा आणि देशाच्या इतर भागांत कढीपत्त्याच्या नावाने गांजा आयात केला जात होता. या व्यवसायात ब्रिजेंद्र हा कल्लूला मदत करायचा.
यांनी आतापर्यंत एक टन गांजा विकून एक कोटी दहा लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. कल्लूने आपली कंपनी बनावट पॅन नंबर आणि जीएसटी नंबरद्वारे कंपनी चालवली आणि या व्यवसायात ई-कॉमर्स कंपनीला 66.66 टक्के नफाही मिळाला, अशी माहिती एसपी मनोज कुमार सिंह यांनी दिली.
मध्यप्रदेशातील भिंडमध्ये पोलिसांनी शनिवारी ऑनलाइन गांजा विकणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला असून टोळीच्या दोन सदस्यांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 20 किलो अमली पदार्थ जप्त केला आहे.
भिंडचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, माहिती मिळाल्यावर कल्लू पवैया (30) आणि ढाबा मालक ब्रिजेंद्र तोमर (35) यांना शनिवारी भिंडमधील ग्वाल्हेर रोड येथून अटक करण्यात आली.

Exit mobile version