मोहोपाडा येथे गांजा विकणाऱ्याला अटक

। रसायनी । वार्ताहर ।
गांजा नामक घातक असणारा अंमली पदार्थ विक्रीसाठी स्वतःजवळ ठेवलेल्याची घटना मोहोपाडा येथे घडली आहे. मोहोपाडा गावचे हददीतील एच.डी. एफ.सी. बॅकेचे समोर आरोपी रा.आळी अंबीवली, ता.खालापुर याने मानवी शरीरावरती परिणाम करणारा 0.115 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ व मोबाईल फोन असा 12 हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा मुददेमाल विक्रीसाठी स्वतःजवळ बाळगलेल्या स्थितीत सापडला. सदर गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास रसायनी पोलीस ठाणे येथ सुरू आहे.

Exit mobile version