अंगणवाडीसाठी खोदकाम करताना उरणमध्ये सापडली तोफ

उरण | वार्ताहर |
उरण डाऊरनगर येथे नव्याने अंगणवाडीसाठी इमारत बनविण्या कामी खोदकाम सुरु असतान अचानकपणे तोफ सदृष्यवस्तू दिसल्याने अतिशय काळजीपूर्वक खोदकाम करण्यात आले. आजूबाजूची माती काळजीपूर्वक बाजूला करण्यात आली व तोफेला काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आल्यावर उपस्थितांनी जय भवानी जय शिवाजी अशा गगनभेदी घोषणानी परिसर दणाणून सोडला.
त्या तोफेची हळद-कुंकू व फुले उधळून पूजा केली.द्रोणागिरी किल्ल्याच्या व द्रोणागिरी पर्वताच्या पायथ्याशी ही ऐतिहासिक तोफ सापडल्याने उरण तालुका पुन्हा एकदा ऐतिहासिक तालुका असल्या बाबतचा पुरवा सापडला आहे. द्रोणागिरी पर्वत रामायण काळापासून अस्तित्वात असल्याचे जुने जाणते माहिती देताना सांगतात त्याच प्रमाणे या पर्वतावर ऐतिहासिक काळातही या किल्ल्याला मोठे महत्व प्राप्त झालेले होते. जुन्या जाणत्यांकडून मिळालेल्या महितीनुसार या किल्यावर 17 तोफा वेगवेळ्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या.सापडलेली तोफ शिवकालीन असावी असा जनतेमधून दावा करण्यात आला असला तरी प्रत्येकक्षात या तोफेची पाहाणी करण्यासाठी पुरात्व विभागाचे अधिकारी व जाणकार दोन दिवसात येणार आहेत तेच खरी माहिती देऊ शकणार आहेत.

Exit mobile version