दारूसाठा हस्तगत

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल रेल्वे स्टेशन जवळील मालधक्का रोड तसेच तालुक्यातील पडघेगाव येथे विनापरवाना बेकायदेशीर दारू विक्री करणार्‍या दोघा इसमांवर पोलिसांनी कारवाई करत बेकायदेशीर मद्यसाठा जप्त केला आहे. विनायक मल्हारी बगाटे उर्फ राजु (वय 38) हा पनवेल रेल्वे स्टेशनजवळील मालधक्का रोड शिवमंदीरा जवळ बिअरच्या तसेच मॅग्डॉल कंपनीची विस्कीच्या बाटल्या त्याच्या ताबे कब्जात बाळगुन विनापरवाना विक्री करीत असताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून पनवेल शहर पोलिसांनी देशी विदेशी मद्यसाठा असे एकूण आठ हजार 530 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Exit mobile version