। ठाणे । प्रतिनिधी ।
मुंबई-नाशिक महामार्गावर सोमवारी (दि. 30) सकाळच्या सुमारास एका कारला अचानक आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर सोमवारी सकाळी एका कारला अचानक आग लागली. ही कार नाशिकच्या दिशेने जात होती. दरम्यान दिवे अंजूर भागात ही कार आली असता, अचानक कारच्या पुढील भागाला आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीमुळे कारचा पुढील भाग जळून खाक झाल्याने कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेनंतर परिसरात वाहतूक कोंडी झाली. घटनेची माहिती ठाणे वाहतूक पोलिसांना मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी वाहतूक कोंडी सोडविली आहे.







