कारची कंटेनरला धडक; दोघांचा मृत्यु, दोन जखमी

| रसायनी | प्रतिनिधी |

मुबंई पुणे एक्सप्रेसवेवर शुक्रवारी (दि.28) दुपारी तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून एका कारने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत.

मुबंई पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याहून मुबंईकडे कंटेनर हा माल घेऊन जात असताना तो बोरघाट येथे पाठीमागून येणाऱ्या वॅगनर कारने समोरील कंटेनर ला जोरदार धडक दिली असता कंटेनरने समोरील तिसऱ्या वाहनाला धडक दिली असता तीन वाहनांचा अपघात झाला या अपघातात कारमधील 4 जणांपैकी 2 जणांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. 

अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटलची टीम, अपघात ग्रस्त टीमचे सदस्य, खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस, आदी तात्काळ घटनास्थळी दाखल होत कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले तर दोन व्यक्तींचे मृतदेह खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे.

Exit mobile version