खालापूर टोलनाक्यावर कारची दुभाजकाला धडक

। रसायनी । प्रतिनिधी ।

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी पहाटे झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले. यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. खालापूर टोल नाका जवळ ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जात असताना खालापूर टोल नाका येथे चालकाला डूलकी लागल्याने त्याचे स्टेअरींगवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला धडकली. त्याचवेळी तेथे असलेल्या टोल कर्मचाऱ्याला ही धडक बसली. कारमधील वयस्कर आजी आजोबा गंभीर जखमी झाले असून, वाहन चालक त्याची पत्नी, त्याचा मुलगा आणि मुलगी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहेत. यावेळी देवदूत यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान, लोकमान्य ॲम्बुलन्स सर्विस आणि हेल्प फाउंडेशनच्या माध्यमातून या अपघातात मदतकार्य झाले. अपघात घडल्याची माहिती टोल कर्मचाऱ्यांनी तातडीने दिल्याने मदत कार्य वेगाने झाले. ही घटना खालापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याने पोलीस निरीक्षक सचिन पवार यांचे मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.

Exit mobile version