4 जण जखमी
| पनवेल | वार्ताहर |
खारघर येथून पनवेल येथे मित्राला सोडण्यासाठी जाणार्या तरुणांची कार रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रेलरला धडकली. या अपघातात कारमधील एका तरुणाचा मृत्यू झाला असून, अन्य चौघे जखमी झाले आहेत.
आकाश माढा (26, रा. साईनगर) असे या मृत तरुणाचे नाव असून, हरिप्रसाद शेट्टी (26), अनुराग चौधरी (24), रोहन चौधरी (24) आणि हर्षिद झा (21) सर्व रा. खारघर हे पनवेल येथे राहणारा त्यांचा मित्र आकाश माढा याला सोडण्यासाठी कारने जात होते. कामोठे येथील टोलनाका ओलांडून उड्डाण पुलाच्या बाजूने जात असताना रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रेलरचा गाडीचा चालक हरिप्रसाद शेट्टी याला अंदाज न आल्याने त्याची गाडी ट्रेलरला जोरदार धडकली. यात पाचही जण जखमी झाले. त्यातील आकाश माढा हा गंभीररित्या जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.