कारची ट्रकला पाठीमागून ठोकर; तीन जखमी

| पनवेल | वार्ताहर |

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेलनजीक भरधाव वेगात जाणाऱ्या चालकाचा ताबा सुटून कारने ट्रकला पाठीमागून ठोकर मारून अपघात घडला. घडलेल्या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. श्रीकांत कोहनकर (वय 22, रा.पुणे) हा मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरून त्याच्या ताब्यातील डस्टर गाडीने मुंबई बाजूकडे तिसऱ्या लेनने चालवीत जात असताना त्याचा गाडीच्या वेगावरील ताबा सुटून समोर असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या धडकेत डस्टर गाडीचा चालक श्रीकांत कोहनकर व सुहास शिरसागर यांना दोघांना गंभीर दुखापत झाली तर आशिष करमकर किरकोळ जखमी झाला. या तिघांना आयआरबी रूग्णवाहिकेमधून एमजीएम हॉस्पिटल येथे रवाना केले. सदर अपघातग्रस्त कार खाजगी क्रेनने बाजूला घेतले असून वाहतूक सुरळीत करण्यात आलेले आहे.

Exit mobile version