| नवीन पनवेल | वार्ताहर |
तालुक्यातील नांदगाव येथील पुलावर कार अडकल्याची घटना घडली. मुसळधार पाऊस झाल्यानंतर दरवर्षी या पुलावरून पाणी जाते. या पुलावरून एक कार जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि कार पाण्याच्या प्रवाहात अडकली. सुदैवाने यातील चालक बाहेर निघाल्याने कोणताही अनर्थ घडला नाही. त्यानंतर हायड्राच्या मदतीने सदरची कार बाहेर काढण्यात आली.