। खोपोली । प्रतिनिधी ।
इयत्ता दहावीचा निकाल (दि.27) मे ला जाहीर झाला आणि यात गेली दोन दशके आपल्या शैक्षणिक कार्याचा ठसा उमटवणार्या खोपोलीतील करिअर कोचिंग क्लासने या शैक्षणिक संस्थेने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही उज्वल यशाची परंपरा जपली. क्लासच्या दर्शील निकम याने 96.20 टक्के गुण मिळवून सेमी इंग्रजी माध्यमात खालापूर तालुक्यातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवत यशाची परंपरा कायम ठेवल्याने करिअर कोचिंग क्लासचे संचालक डॉ. मुफद्दल सराचे कौतुक होत आहे. तसेच, क्लासमधील जैनी ओसवाल हिने 95.80 टक्के गुण मिळवले आणि शाळेतून दुसरा येण्याचा मान मिळवला. तर, सेमी इंग्रजी माध्यमातून आदित्य थिटे 95.00 टक्के गुण मिळवून शाळेतून द्वितीय, सुजल पाटील याने 89. 80 टक्के गुण संपादन करून शाळेतून तृतीय क्रमांकाचे यश संपादन केले. विशेष म्हणजे करिअर क्लासमधून तब्बल 27 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले. 107 विद्यार्थ्यांनी 75% टक्के पेक्षा अधिक गुण मिळवले असून 168 विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये पास झाले.







